Youth साठी मनोरंजनाचा धमाका !!!


Nashik Vision Youth Festival 2017

नाशिक म्हणजे तीर्थक्षेत्र, कुंभमेळा, कांदा व्यापारी, द्राक्ष, नाशिकची वाईन अशा अनेक गोष्टींमुळे नाशिक प्रसिद्ध आहे. परंतु आणखी एका गोष्टीमुळे नाशिक जगप्रसिद्ध आहे ते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक अर्थात दादासाहेब फाळके हे देखील नाशिकचेच होते. आज मराठी सिनेमा जो बहरला आहे हे त्यांनीच पाहिलेले स्वप्न होते. असेच स्वप्न तारुण्याच्या उंबरठयावर असलेली तरुणाई पाहत असते. क्रमिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त गायन, नृत्य आणि मॉडेलिंग मध्ये आवड असणाऱ्या कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे Nashik Vision Youth Festival 2017.

गेल्या चार वर्षापासून नियमितपणे नाशिक व्हिजन – युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये महाविद्यालयीन युथ फेस्टिवल बंद आहेत. यासाठीच नाशिक व्हिजन या संस्थेकडून या युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. फक्त नाशिकमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होत असतात. यासाठी अनुक्रमे मॉडेलिंग, गायन आणि नृत्य यासाठी नाशिकमध्येच ऑडिशन घेण्यात येतात आणि यातूनच स्पर्धक मुख्य फायनलमध्ये पोहोचतो. यावेळची फायनल रविवार दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका नाशिक येथे होणार आहे.

nashik-vision-f-2

यावेळी महोत्सवाचे आयोजक नंदन भास्कर म्हणाले की, तरुणांमध्ये एक उत्साही उर्जा असते आणि ती उर्जा त्यांच्या कलागुणांना जगासमोर आणण्यासाठी वापरली जावे या हेतूने आम्ही या महोत्सवाचे आयोजन करत असतो. त्यासाठी आम्हाला सर्व नाशिकच्या नागरिकांचे आणि विशेषतः सर्व तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे सहकार्य लाभत असते. यासोबतच अध्यक्ष चैतन्य व्यवहारे, मुख्य समन्वयक ललित मानकर, उपाध्यक्ष गौरव सोनार यांचे देखील मार्गदर्शन लाभते त्यांच्यामुळेच हा महोत्सव अधिक रंगतदार होत असतो. या महोत्सवाला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार नेहमीच हजेरी लावत असतात.

आयोजकांकडून सर्व नाशिकरांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी संपर्क – ८८८८८१४३८८

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 2

Leave a Reply

Youth साठी मनोरंजनाचा धमाका !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.