गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये – “माज…. फिनीश ईट”


माणूस ज्या वातावरणात राहत असतो त्यानुसार तो बदलत जातो. ज्या वातावरणात आपण वावरतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. ‘गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये’ असं म्हटल जात. आजकल प्रत्येक श्रीमंत माणसाला पैशाचा माज चढलेला दिसतो. ह्याच विषयावर आधारित अनुष्का ईमॅजिन फिल्म्स प्रस्तुत “माज… फिनिश ईट” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत . ह्या चित्रपटाचे निर्माते संदीप पोपट टकले असून आशिष कैलाश जैन हे दिग्दर्शक आहेत. ह्या चित्रपटातून अमित रेखी आणि अर्चना संकेत ही नवीन जोडी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

जागतिकीकरणाच्या स्पर्ध्येत प्रत्येक जण आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये लहान – लहान  खेडी सुद्धा पाठी नाहीत. आपली शेती विकून आलेल्या पैशाचा वापर मौजमजा करण्यासाठी केला जातो आणि त्याला साथ असते उधळपट्टी करणाऱ्या मित्रांची आणि हेतू साध्य करणाऱ्या राजकारणांची… एकाच वेळी आलेल्या एवढ्या पैशाचा वापर मग अनेक वाईट कामासाठी केला जातो, पैशाचा माज तयार होतो आणि त्याच्या त्याच्याचं जीवावर माणूस सगळं काही वोक्त घेण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्या वेळी पैसा संपतो त्यावेळी वास्तवाची जाणीव त्याला होते, पण वेळ निघून गेलेली असते. तेव्हा त्या व्यक्तीकडे पश्यातापाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. असा ह्या माज चित्रपटाच्या कथेचा सारांश असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष जैन म्हणाले.

ह्या चित्रपटात अमित रेखी आणि अर्चना संकेत ह्या नव्या जोडी सोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक जाणते कलाकार आपल्याला दिसून येतील. हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुणे परिसर आणि आजूबाजूच्या शहरातील जमीन विकून अचानक झालेल्या श्रीमंत लोकांची आणि त्यांना आलेल्या श्रीमंतीच्या माजाची कथा सांगणारा ‘माज’ चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून लवकरच त्याचा ऑफिशियल ट्रेलर येणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये – “माज…. फिनीश ईट”

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.