विनोदाचा पावरपॅक असणारा ‘चोरीचा मामला’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित….


नुकतीच सोशल मिडीयावर ‘चोरीचा मामला’ ह्या मराठी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची खबर पसरली होती. सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव तसेच सिनेमातील कलाकार हेमंत ढोमे, किर्ती पेंढारकर, अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, क्षिती जोग ह्या सर्वानीच आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर ट्रेलर चोरीला गेल्याचा व्हिडीओ टाकला होता. परंतु आता हा ट्रेलर सापडला असून सोशल मिडीयावर तो धुमाकूळ घालत आहे.  एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली असून चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका दिग्दर्शकाने दिल्याचे ट्रेलर पाहिल्यावर कळून येते. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच आता चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर खळखळून हसविणारा आहे. प्रेक्षक ट्रेलरला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय सुरेख आणि प्रेक्षकांना ताल धरायला लावणारी आहेत. अनेक वर्षांनी विनोदाचा पावरपॅक असणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. येत्या ३१ जानेवारीला हा धमाल, विनोदी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

 

Comments 0

Leave a Reply

विनोदाचा पावरपॅक असणारा ‘चोरीचा मामला’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.