वेगळा जॉनर आणि एका नव्या जोडीचा ‘माज – फिनिश ईट’


‘गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये’ असं आपण नेहमी ऐकत असतो. माणसाकडे अपेक्षेपेक्षा जास्त पैसा आला की त्याला एक वेगळीच उर्मी आणि माज चढतो. तो व्यक्ती नेहमीच इतरांना त्याच्यापेक्षा कमी लेखतो. अशाच विषयावर आधारित ‘माज फिनिश ईट’ ह्या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. अनुष्का इम्याजिन फिल्म्स प्रस्तुत ‘माज फिनिश ईट’ ह्या चित्रपटाचे निर्माते संदीप पोपट टकले असून आशिष कैलाश जैन हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘माज फिनिश ईट’ चित्रपटाच्या निमित्ताने अमित रेखी आणि अर्चना संकेत ही नवीन जोडी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ह्या चित्रपटानिमित्त दिग्दर्शक आशिष जैन ह्यांनी कॅफेमराठीशी दिलखुलास गप्पा मारल्या…

परिस्थितीनुसार माणूस हा बदलत असतो. ज्या वातावरणात मनुष्य राहतो त्या वातावरणाचा मनुष्यावर कळत नकळत परिणाम होतो. जागतिकीकरणाच्या स्पर्ध्येत प्रत्येजण आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये लहानमोठी खेडीसुद्धा मागे नाहीत. स्वतःची शेती, जमीन विकून आलेल्या पैशाचा वापर मौजमजा करण्यासाठी करतात आणि त्याला साथ मिळते ती उधळपट्टी करणाऱ्या अवली मित्रांची आणि हेतू साध्य करणाऱ्या राजकारणी लोकांची. एकाच वेळी आलेल्या एवढ्या पैशांचा वापर मग अनेक वाईट कामांसाठी केला जातो. अशावेळी माणसामध्ये पैशाचा माज तयार होतो आणि त्याचं माजाच्या जीवावर माणूस सगळं काही विकत घेण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू त्यात गुरफटून जातो, आणि ज्यावेळी पैसा संपतो त्यावेळी वास्तवाची जाणीव होऊन पश्यातापाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. असा हा माज चित्रपट असल्याचे आशिष जैन कॅफेमराठीशी बोलताना सांगत होते. चित्रपटामध्ये असणारी नवीन जोडी अमित – अर्चना ह्यांच्याबद्दल बोलताना हते म्हणाले की, अमित हा रंगभूमीवरचा उत्तम कलाकार आहे पण त्याला स्टेज एक्टिंग आणि कॅमेरा एक्टिंग ह्यांच्या मधला फरक  समजवून सांगावा लागला पण त्या नंतर त्याने उत्तम काम केलं. आणि अर्चना ही एकदमच फ्रेश असल्यामुळे तिच्यावर जास्त मेहनत ह्यावी लागली परंतु तिने ही सर्व गोष्टी लवकरात लवकर आत्मसात करून उत्तम अभिनय केला असल्याचे ते म्हणाले. ह्या चित्रपटाची शुटींग ही मुंबई, पुणे, लोणावळा, कोल्हापूर, इचलकरंजी ह्या शहरांमध्ये झाली असल्याचे ते सांगत होते.

दिग्दर्शक म्हणून ह्या आधी ही अनेक अडचणींना सामोरे गेलोय. ह्या आधी ही ४ मराठी चित्रपट केले पण ते काही कारणास्तव प्रदर्शित झाले नाहीत. पण ह्या चित्रपटाचा अनुभव खूपच चांगला ठरला. चित्रपट करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे एका सीनसाठी हेलिकॉप्टरची गरज होती पण तो हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पर्मिशनचं मिळत नव्हती. हा एकच मेजर पार्ट होता ज्यामध्ये अडचण आली. असं आशिष जैन सांगत होते. निर्माते संदीप टकले ह्यांच्याबद्दल ही ते सांगताना म्हणत होते की, खूप फ्रेंडली आणि डाऊन टू अर्थ आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचं दडपण मला जाणवू दिल नाही. असं ही ते म्हणाले.

ह्या चित्रपटात अमित – अर्चना ह्या जोडी व्यतिरिक्त सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, वृंदा बाळ, चंचला बनकर, प्रेम नरसाळे, मिलिंद जाधव, अभिमान उनवणे, शुभम मांढरे, उत्कर्ष खंडाळे, पूनम कापसे, शिवानी कथले, शबनम मोमीन, संदीप पाटील, अश्विनी चव्हाण, जगदिश कुंभार एवढी मोठी आणि तगडी स्टारकास्ट आहे. तसेच ह्या चित्रपटात २ गाणी असून त्यातील एक गाणे हर्षवर्धन वावरे ह्याने गायले असून आयटम सॉंग रेश्मा सोनावणे हिने गायले आहे. आकर्षक शिर्षक, वेगळा जॉनर आणि एका नव्या जोडीचा हा माज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा दिग्दर्शक आशिष जैन ह्यांनी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांवर ह्या चित्रपटाचा ‘माज फिनिश ईट’ कितपत चढेल हे येत्या २ ऑगस्टला कळेलच…

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

वेगळा जॉनर आणि एका नव्या जोडीचा ‘माज – फिनिश ईट’

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.