मराठी सिनेमा : वार्षिक निकाल


पाहता पाहता मनोरंजनाचे अनेक नवनवीन उच्चांक आणि धक्के रिचवत 2016 हे वर्ष संपले. 2016 हे वर्ष मराठी सिने-जगतासाठी तसे खूप महत्वपुर्ण ठरले. याचं वर्षात आजवरचा सर्वाधिक व्यवसाय करणारा पहिला मराठी सिनेमा म्हणजे Sairat. अनेक Bollywod मंडळी याचं वर्षात मराठीत आली. अनेक नवनवीन चेहरे, धाडसी विषय देखील या वर्षात भरपूर आले. Ashwini Ekbote सारखी गुणी अभिनेत्री देखील याच वर्षात आपल्यातून निघून गेली. Shruti Marathe, Mrunmayi Deshpande या सुंदर मुली लग्नाच्या बेडीत अडकल्या त्याही याच वर्षात! 2016 या वर्षात जवळपास एकूण प्रदर्शित चित्रपटांची संख्या 88 इतकी होती. यापैकी तुमच्या आमच्या लक्षात किती राहिले, कोणते सिनेमे जोरदार आपटले? कोणत्या सिनेमाने घोर निराशा केली??? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं CaféMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहेत.

फक्त Natasamrat

Natsamrat Nana

January 2016 या वर्षाची सुरुवातचं Nana Patekar आणि Mahesh Manjrekar यांच्या Natasamrat या Classic सिनेमाने झाली. Zee च्या या सिनेमाने Box Office वर मजबूत कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर जादूचं केली. एकीकडे Natasamrat Hit चालत असतांना याच महिन्यात आलेल्या Swapnil Joshi आणि Sachit Patil यांच्या Friends ला कुणी ढुंकूनही पाहिले नाही. हे कमी होते म्हणून कि काय Sajnay Jadhav चा Guru देखील डब्ब्यात गेला. Bandh Naylon Che सकट सर्व 11 सिनेमे सपशेल आपटले.

हवी तशी चमकली नाही Poshter Girl

poshter-girl-kathavar-pass

February 2016 मध्ये आलेल्या Poshter Girl ला Poshter Boy सारखे यश संपादन करता आले नाही. असं का घडलं कुणालाच समजले नाही. Flop चे सत्र या महिन्यात देखील सुरु राहिले. त्यात भरीस भर म्हणजे Marathi Tigemumbrs, Police Line, Mumbai Time या चित्रपटांनी फक्त हजेरी लावली. Mr. & Mrs Sadachari कडून अपेक्षा होती. परंतु Vaibhav Tatvawadi ने देखील निराशाच केली.

Flop Phuntroo & Anurag

Phuntroo-Posterमार्च महिन्यात चित्रपटांची संख्या तशी कमी जरी झाली होती तरी चांगल्या चित्रपटांची उणीव भासतच होती. Science Fiction म्हणून प्रचार करण्यात आलेला Phuntroo म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी गत झाली होती. भल्या मोठ्या जाहिराती देत Mrunmayi Deshpande हि निर्मितीत उतरली Anurag या चित्रपटातून. पण हा Anurag कधी आला आणि कधी गेला समजलेच नाही. या तीनही महिन्यात फक्त एकाच सिनेमाची जादू कायम राहिली ती म्हणजे Natasamrat.

Sairat ने याड लावलंSairat-2016-350x350

April 2016 मध्ये Nagraj Manjule च्या Sairat ने संपूर्ण महाराष्ट्राला खरोखर याड लावलं. Metropolitan City पासून ते गावच्या पारापर्यंत फक्त आणि फक्त Sairat ची चर्चा होती. सिनेमाने यशाची अनेक उत्तुंग शिखरं गाठत, आर्ची आणि परश्याच्या Sairat ने मराठी चित्रपटाच्या इतिहासात नोंद करत शंभर कोटीचा पल्ला गाठला. याच महिन्यात Vrundavan नावाचा मोठ्या Budget चा सिनेमा आला. परंतु बहुतेक वेळ चुकल्यामुळे या सिनेमाला अपयश आले. पुढे 3 ते 4 आठवडे एकही मराठी सिनेमा झळकण्यास धजत नव्हता. अनेक सिनेमांचे प्रदर्शन Sairat मुळे पुढे ढकलण्यात आले होते.

Sairat चा जलवा कायम 7 Sairat location

April 2016 अखेरीस आलेल्या Sairat ने अनेक वर्षांनी मराठी सिनेमाला Houseful चा बोर्ड दाखवला. Rinku Rajguru आणि Akash Thosar हे दोन नवे चेहरे मराठी सिनेमाला मिळाले. तरी देखील नंतरच्या May महिन्यात काही सिनेमे त्यांच्या हिमतीवर Release झाले खरे परंतु त्यांच्या पदरी घोर निराशा आली. Sajay Leela Bhansali यांचा Laal Ishq देखील कधी आला आणि कधी गेला हे समजले सुद्धा  नाही.

Flop चा पाऊस – Albela सरस ठरलाCover albela

June 2016 मध्ये पाऊस पडावा तसे सिनेमे आले आणि जोरदार पडले देखील. या महिन्यात एकूण 13 सिनेमे प्रदर्शित झाले. सर्व वेगवेगळ्या विषयांचे असून त्यातला एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. Lalbaug Chi Rani वेगळा विषय होता. मोठे धाडस करत हा सिनेमा पुढे आला पण लोकांना त्याला कौल दिला नाही. Cheater खरोखर सर्व बाबतीत चिटर निघाला. Pindadan आणि Barni लक्ष्यवेधी ठरले नाही. परंतु Ganvesh आणि Ek Albela हे देखील अपेक्षेप्रमाणे चालले नाही.

खूप आले पण भावले नाहीLost & Found C

July 2016 – Flop चा पाऊस झाल्यानंतर नवीन काही चांगलं बघायला मिळेल अशी अपेक्षा होती. एकूण सात सिनेमे या महिन्यात आले. पर इन्हे पब्लिक की साथ नही मिली. Made in Maharashtra, Yaroo Ki Yari, Astu, Kiran Kulkarni vs Kiran Kulkarni आणि Lost and Found यांचा तर निभाव लागलाच नाही. & Jara Hatke हटके असेल असा वाटला होता पण चालला नाही हेच सत्य आहे.

फक्त YZYZ Marathi Movie Poster (1)

August 2016 मध्ये एकूण 8 चित्रपट आले. खरंतर खूप वेगवेगळे प्रकार होते सर्व. परंतु एकाच महिन्यात भरमसाट सिनेमांची भर पडल्याने सर्वांचाच तोटा झाला. Taleem हवी तशी रंगली नाही. Disco Sannya चा Dance आवडला नाही. वेगळ्या वाटेवरचा Chourya वाटेवरच राहिला. Avdhoot Gupte चा Kanha सुद्धा Washout झाला. मग पुढे 1234, Photocopy, Yarsi Dosti जेमतेम होते. याच महिन्यात Sai Tamhankar आणि Mukta Barve चा YZ आला. हाच काय तो या महिन्यात चालला.

अपेक्षाभंग One Way TicketOne way Ticket I

September 2016 या महिन्यात फक्त 3 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातला फक्त एकमेव One Way Ticket हा सिनेमा अपेक्षा पूर्ण करणार असे वाटत होते. परंतु या सिनेमाने तर जबरदस्त अपेक्षाभंग केला. Cruz वरचे Scenes प्रेक्षकांना आकर्षित करतील असे वाटले होते पण तसे झाले नाही. शेवटी आलेले Mr.& Mrs. Unwanted आणि A Dot Com Mom यांच्याबद्दल न बोललेच बरे होईल.

Family Katta उजवा ठरलाfamily-katta

October 2016 उजाडला आणि पुन्हा Zee चा बिगुल वाजला. Ajay Atul ची निर्मिती असलेला आणि Girish Kulkarni चे पहिले दिग्दर्शन असलेला Jaundya Na Balasaheb हा सिनेमा धुमधडाक्यात आला. परंतु तेवढ्याच जोरात हा सिनेमा पडला देखील. चांगले संगीत असूनही भट्टी जमली नाही हे मात्र खरे होते. या Zee च्या गर्दीत Chandrakant Kulkarni यांचा एक चांगला सिनेमा Family Katta आला. Family सोबत पहावा असा हा सिनेमा होता. सर्व काही चांगले असूनही Zee च्या सिनेमामुळे फारसे Theatre न मिळाल्याने हा सिनेमा थोडा अडचणीत आला. Zee सोबत हा सिनेमा नसता आला तर खूप वेगळे चित्र दिसले असते. मध्यंतरी Ghanta नावाचा सिनेमा आला होता. खरंच मराठीमध्ये असे सिनेमे यायला हवेत परंतु सिनेमाला घंटा यश मिळाले. नंतर Jalasa, Prem Sankat, Kaul Manacha, Nivdung यांच्याबद्दल कशाला बोलायचे असा प्रश्न येतो.

Ventilator ने तारलंventilator review

Priyanka Chopra ची पहिली चित्रपट निर्मिती असलेला Ventilator सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. भावूक करत समीक्षकांनी देखील उत्तम दाद या सिनेमाला दिली. Priyanka ची Entry दमदार ठरली. यात तिच्या अभिनयाची झलक देखील पहायला मिळाली. Sai Tamhankar आणि Priya Bapat चा Vazandaar सिनेमा नोटबंदीमुळे चालला नाही असे सांगितले जात होते, परंतु सिनेमात अज्जिबात वजन नव्हते हेच खरे आहे.

वर्ष अखेर मंदावली – सर्वच Flopbhootkal-page-cover

December 2016 म्हणजेच वर्ष अखेर. निरोप देण्याची वेळ. हा शेवटचा महिना फार काही कमाल दाखवू शकला नाही. Bhootkaal, Nagpur Adhiveshan, Tu Bold Mee Cold यांना अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. Halal सिनेमा पुरस्कार घेतांना दिसून आला. 2017 मध्ये हा सिनेमा नक्की येईल की माहित नाही.

2016 या वर्षात फक्त बोटावर मोजण्याइतके सिनेमे चालले. Natasamrat, Sairat, Half Ticket, Family Katta, YZ आणि Ventilator एवढेच ते सिनेमे. आता २०१७ वर्षभरात मराठी सिनेमात काय काय नवीन घडते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठी सिनेमा : वार्षिक निकाल

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.