100 Days चा Countdown सुरु…


पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत रहस्य गुपित ठेवलेल्या Ratris Khel Chale या मालिकेचा नुकताच शेवट झाला. अशाच प्रकारच्या रहस्याचा एक नवा थरार दाखवणारी 100 Days ही मालिका Zee मराठीवर 24 ऑक्टोबरपासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

100-days-1-day

या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 100 दिवसात उलगडणाऱ्या रहस्याचा हा प्रवास 100 भागातच दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच Tejaswini Pandit आणि Adinath Kothare या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत. याशिवाय मालिकेत Ramesh Bhatkar , Archana Nipankar ,Siddheshwar Zadbuke यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कधी कधी एखादी व्यक्ती एखादं रहस्य स्वतःजवळ बाळगून असते आणि कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःच एक रहस्य असते. अशा व्यक्तीच्या सहवासात राहूनही तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नाही आणि ती कधी कुठला डाव खेळेल ते सुद्धा सांगता येत नाही. अशाच एका रहस्याची,  त्या रहस्यामागे असणाऱ्या व्यक्तीची आणि त्या रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट प्रेक्षक सद्ध्या अनुभवत आहेत.

100 Days म्हणजे – 

100 Days 2

ही गोष्ट आहे Raani (Tejaswini Pandit) आणि Dhanjay Sardesai  (Ramesh Bhatkar) या जोडीची. दोघांचा संसार सुरळीत आणि सुखात सुरु असतानाच Raani तिच्या नवऱ्याला म्हणजेच Dhanjay ला power of attorney तिच्या नावावर करायला सांगते आणि त्या वेळेस Dhanjay तिला नाही म्हणतो. यानंतर Raani एक Plan बनवते आणि दुसऱ्या दिवशीच Dhanjay अचानक बेपत्ता होतो. अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही धनंजयचा माग काही लागत नाही.

100 days 3

धनंजयच्या बेपत्ता प्रकरणाची जबाबदारी Police Inspector Ajay Thakur (Adinath Kothare) याच्याकडे येते. Ajay एक प्रामाणिक Police अधिकारी असल्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा आणि प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणारा अधिकारी अशी त्याची प्रतिमा पोलिस दलात आणि गुन्हेगारी विश्वातही आहे असे दिसतंय. या केसच्या निमित्ताने तो Raani ला भेटतो आणि त्याला संशय आहे की या सर्वामागे Raani च असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु त्याच्याकडे ठोस पुरावा नसल्याने तो तिला अटकही करु शकत नाही. अजयच्या प्रामाणिकपणाबद्दल राणीलाही माहित आहे त्यामुळे स्वतः जाळ्यात अडकण्याऐवजी अजयलाच कसं आपल्या जाळ्यात ओढता येईल याचा प्रयत्न राणी सुरु करते. या दोघांच्या शह-काटशहाची ही रोमहर्षक गोष्ट आहे.

पहिल्यांदा एखादी मालिका मर्यादित ठरवून Zee Marathi ने १०० भागांची अनोखी मालिका आपल्या समोर आणली आहे. मर्यादित वेळ आणि रहस्य याने प्रेक्षकांना ती कसे गुंतवून ठेवेल हे बघायला हवं. Hindi संगीतक्षेत्रात आपल्या वेगळ्या गायकीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या Harshdeep Kaur ने या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे.

Ratris Khel Chale ची निर्मिती करणारे Santosh Ayachit आणि Sunil bhosale यांच्या Sajari Creatives ने या मालिकेची निर्मिती केली असून त्याचं लिखाण Santosh Ayachit यांचे तर संवाद लेखन Pralhad Kudtarkar यांचं आहे तर दिग्दर्शन Vighnesh Kambli यांचं आहे.

मराठी मालिकांच्या विश्वात झी मराठीने आजवर अनेक यशस्वी प्रयोग केले आणि प्रेक्षकही त्याला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

100 Days चा Countdown सुरु…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.