5 स्त्रीप्रधान चित्रपट – Everyone Should Watch


Women are the real architects of the society…

हे ज्यांनी कोणी म्हटलं आहे ते खरचं आहे. अरेरे…! असे serious होऊ नका. मी काही तुम्हाला स्त्री-शक्तीवर प्रवचन देणार नाही हं. परंतु आज मराठीमधील अशा प्रकारच्या पाच Women Oriented चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये पूर्वीपासूनच स्त्रीप्रधान चित्रपटांची निर्मिती होत आली आहे. हे चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी आवर्जून पाहिलेच पाहिजेत.

BINDHAST

Women Oriented 1

नाव एकदम हटके आहे ना? शिर्षकाप्रमाणेच BINDHAST, मौज- मस्ती करणाऱ्या मैत्रिणींचा हा चित्रपट आहे. Thriller आणि Suspense ची धम्माल Entertainment यात आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटाबद्दल एक मजेदार गोष्ट तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये ३६५ मुलींचा सहभाग होता. तसेच मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये हा एकमेव असा चित्रपट आहे ज्यात एक पुरुष कलावंत सोडल्यास बाकी सर्व स्त्री कलावंतानी काम केले आहे.

POSTER GIRL

Women Oriented 2

नावावरून थोडंसं confused झालात ना? होणारंच…..! बरं तसंही “नाम मै क्या रखा है?” तसंच काहीसं या चित्रपटाचं आहे.  सर्रास होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्येसारखा गंभीर विषय असूनही त्याला विनोदी अंगाने पेश केल्यामुळे POSTER GIRL हा चित्रपट चर्चेत आला. अरे….लग्न करण्यासाठी जर मुलीच उरल्या नाहीत तर कसं होणार तुमचं? हा चित्रपट तुम्ही एकदा तरी नक्की पाहा मग कळेल……

 

CANDLE MARCH

Women Oriented 3

स्त्री-अत्याचार हा काही नवीन विषय नाही. परंतु मित्रांनो, साहजिकच आपल्या मनात पण कधी कधी असे विचार येत असतील कि यार….. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या वाईट कृत्यांच्या विरोधात आपण एकत्र येऊन एखादी चळवळ उभी करायला हवी आणि नेमके हेच CANDLE MARCH मधुन दाखविले आहे. तुमच्या मनातील सुप्त विचार खरे झाल्यावर काय चित्र उभे राहील हे CANDLE MARCH  मधून तुम्ही पाहू शकता.

 

ME SINDHUTAI SAPKAL

Women Oriented 4

आपण Mee Sindhutai Sapkal हा चित्रपट तुम्हाला माहित असेलच. हजारो अनाथ मुलांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण करणाऱ्या सिंधुताई यांचा हा चरित्रपट. स्वतः एकेकाळी अनाथांसारखे जीवन जगणाऱ्या असहाय सिंधुपासून ते आज हजारो ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख असणाऱ्या सिंधूताई इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आला आहे.

UMBARTHA

Women Oriented 5

काही कळले का शीर्षकावरून? यात एक स्त्री आपल्या घराचा उंबरठा ओलांडून म्हणजेच तिच्यावर असलेली बंधने, मर्यादा झुगारून सामाजिक कार्यात उतरते आणि घरातून, समाजातून होणारा विरोध सहन करून आपले कार्य चालू ठेवते. इतके Serious नका होऊ. In Short सांगायचं म्हणजे एका स्त्रीने अन्यायाविरोधात पुकारलेले बंड यात दर्शवले आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

5 स्त्रीप्रधान चित्रपट – Everyone Should Watch

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.