….तिने सेटवरच युनिटसाठी चुलीवर केल्या भाकरी


Halal Upcoming Marathi Movie…

सध्या सगळीकडे जोरदार चर्चेत असलेला, ६ ओक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या Halal सिनेमाबद्दल एक वेगळीच बातमी कानावर आली आहे.. तुम्हीच बघा काय आहे ते.

पुण्याची Pritam Kagne हिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात पुण्यात नाटकातून केली. अजब लग्नाची गजब गोष्ट हे तिचं गाजलेलं नाटक. नवरा माझा भवरा, निलेश साबळेसोबतचा तिचा सिनेमा. एक चांगले नाटक आणि एक सिनेमा झाल्यानंतर घरच्यांना माझ्या कामावर विश्वास वाटू लागला…Pritam Kagne सांगत होती, ती पुढे म्हणाली कि, या सिनेमानंतर मी मि.बिन नावाचा एक मल्याळम आणि ३१ ऑक्टो हा हिंदी सिनेमा केला. ३१ ऑक्टो या सिनेमाच्या सेटवरच Director Shivaji Patil यांनी मला Halal सिनेमाची गोष्ट ऐकवली, जी माझ्या भावाने म्हणजे Amol Kagne ने घरी सांगितली, आणि मग वडिलांनी निर्मिती करायचे ठरवले.

Halal सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल Pritam सांगते कि, Halal सिनेमात मी हलीम या मुस्लीम मुलीची भूमिका साकारते आहे. जी गावात राहणारी एक साधी मुलगी आहे, तिचा नवरा हेच तिचं विश्व आहे. घरातील एका छोट्या कारणावरून आमचे नवरा बायकोचे भांडण होते आणि त्याने उच्चारलेल्या तलाक या तीन शब्दांनी तिचं जगच संपून जातं. तलाक नंतर हलीम घरी परतते. पण नवऱ्याकडून निघून आल्यावर समाज तिलाच दोषी समजू लागतो. काही दिवसांनी पुन्हा नवऱ्याकडे परत जाण्यासाठी तिला ह्लालाचा नियम पाळावा लागतो, तो म्हणजे दुसऱ्या मुलासोबत लग्न करून, त्याच्यासोबत तीन महिने राहून त्याला तलाक देऊन मग पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत लग्न करता येणार होते.

भाकरींची नेमकी गंमत काय आहे? यावर Pritam सांगते कि, सिनेमातील एका दृश्यात हलीम म्हणजे मला चुलीवर भाकरी करायचा प्रसंग होता, काही तांत्रिक कारणामुळे सीन दोन तीन वेळा रिटेक झाला, मग सगळ्यांची इच्छा म्हणून त्याच चुलीवर सर्व युनिटसाठी भाकरी मी केल्या. खरंतर चुलीवर भाकर करण्याचा माझा तसा ह पहिलाच अनुभव होता. धुराचा खूप त्रास मला होत होता तरीही मी आनंदाने सगळ्यांसाठी भाकरी केल्या.

सिनेमातील कलाकारांबद्दल ती सांगते कि, Priyadarshan Jadhav, Chinmay Mandlekar, Amol Kagne, Chhaya Kadam, Vijay Chavhan यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. Priyadarshan आणि Chinmay या दोन्ही मोठ्या कालाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. दिग्दर्शक Shivaji Patil यांचा गोष्टीवरचा अभ्यास खूप असल्याने अनेक बारकावे मला त्यांच्याकडून शिकायला मिळत होते.

शेवटी Pritam बोलते कि, आता अनेक Awards मिळवून Halal तुमच्या भेटीला येणार आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी या सिनेमाची गोष्ट आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
3
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

….तिने सेटवरच युनिटसाठी चुलीवर केल्या भाकरी

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.