Happy Birthday Legend Mohammad Rafi !!!


-Tushar Sawant (Shivaji Park)

मी काही अजूनपर्यंत उभ्या आयुष्यात देव पाहिला नाही… हो! पण देवाला ऐकले मात्र जरूर आहे आणि ते पण सुरात… जेव्हा कधी मी उदास झालो तेव्हा त्याने मला “मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे मी उडाता चला गया” असे म्हणत आयुष्याकडे positively बघायचा Attitude दिला. तर देशप्रेमाची भावना “कर चले हम फिदा जानो तन साथियो” म्हणत जागृत केली. “जानेवालो जरा मुडके देखो मुझे, मै भी इन्सान हू तुम्हारी तरह” म्हणत मला सामाजाभिमुक बनवले. तर “दर्दे दिल दर्दे जिगर” म्हणत माझ्यावर शृंगाररसाचा अलगद शिडकावा केला. अश्या प्रकारे लोकांच्या सुख-दुखाःच्या प्रसंगी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी परमेश्वराने ज्या अनमोल गळ्याची साथ घेतली. त्या जगातील आठवे आश्चर्य म्हणजेच आपल्या लाडक्या Rafi चा आज वाढदिवस आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…

rafi-2

या निमित्ताने Rafi बद्दल थोडे फार लिहायचा प्रयत्न… त्यांचा जन्म 24 December 1924 पंजाब येथे झाला. त्यांच्या संगीतातील प्रवासाबद्दल सांगायचे तर त्यांनी भारतातील जवळपास सर्वच भाषांमध्ये तब्बल 24000 गाणी गायली आहेत. ते जेव्हा 7 वर्षाचे होते. तेव्हा ते त्यांच्या मोठ्या भावाच्या नाव्ह्याच्या दुकानात बसत. तेव्हा तिथून जाणारया एका फकीराच्या आवाजाची ते नक्कल करायचे. ते जेव्हा त्याच्या भावाला कळले तेव्हा त्यांनी त्यांची गाण्याची रुची ओळखून त्यांना गाण्यास पाठविले. त्यांना वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी गायची संधी मिळाली. ती पण कशी तर एकदा Kundanlal Sehegal यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. तेव्हा अचानक वीज गेल्यामुळे त्यांनी गाण्यास नकार दिला आणि मग Rafi ने आपल्या गोड गळ्याने रसिकांच्या मनावर जी जादू केली ती आजतागायत आपण अनुभवत आहोत.

rafi-3

हे झाले Rafi च्या संगीताबद्दल पण माणूस म्हणूनही ते फार महान होते. Laxmikant Pyarelal या विख्यात संगीतकारांसाठी त्यांच्या struggling phase च्या वेळी ते केवळ त्यांच्याकडून १ रुपया शगुन म्हणून घेउन गाणे गायचे. एकदा recording झाल्यानंतर तब्बल दोन तास ते Studio च्या बाहेर उभे होते. जेव्हा Naushad जी आले व त्यांना याचे कारण विचारले तर त्यांनी सांगितले की, घरी जायला ट्रेनचे तिकीट काढायला पैसे नाही आहेत. तेव्हा Naushad जी म्हणाले की मग मागून घ्यायला हवे होते ना? त्यावर Rafi बोलले की recording अजून पूर्ण झाली नाही आहे, उद्या पुन्हा यायचे आहे तेव्हा विचार केला की आजची रात्र Studio बाहेरच काढतो उद्या recording पूर्ण झाल्यावरच पैसे घेईन. हे ऐकून Naushad जी यांचे डोळे पाणावून गेले. कदाचित हाच तो प्रामाणिकपणा त्यांच्यात होता. म्हणूनच देवाने त्यांना हे वरदान दिले.

rafi-1

एक आठवण अशी ही आहे की, एकदा Signal ला गाडी थांबली असता त्यांनी भिकाऱ्याला खिशात हात घालून होते, तेवढे सगळे पैसे काढून दिले. त्यांना विचारले की तुम्ही किती दिले हे बघितले नाही तेव्हा ते म्हणाले की, “देवाने सुद्धा मला देताना काहीच कमी दिले नाही, तर मी त्याच्याच एका अंशाला देताना का बरे असा विचार करू?” एवढ्या Glamours जगात राहून देखील त्यांना साध्या सुपारीच्या खंडाचे देखील व्यसन नव्हते. पण हो त्यांना एका गोष्टीचे जरूर व्यसन होते. ते म्हणजे badminton खेळायचे. ते सकाळी लवकर उठून badminton खेळत असत व recording दरम्यान कधी वेळ मिळाला की लगेच एक खेळ खेळत.

rafi-4

जणू काही त्यांनी आपल्या आचरणातून आदर्श, राहणीमानाचा पायंडाच घातला होता. आजच्या काळात थोड्याश्या यशाने हुरळून जाणाऱ्या कलाकारांनी खूप काही शिकण्यासारखे आहे या सुरांच्या अवलीयाकडून. त्यांची जनमानसालाच नव्हे तर निसर्गाला सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाने एवढे वेड लावले होते की, 31st July 1980 ला जेव्हा त्यांचे दुखःद निधन झाले तेव्हा धो धो पाऊस कोसळत होता. जणू काही साश्रू नयनांनी तो गंधर्वाला शेवटचा अलविदा करत होता. त्यावेळी दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर केला होता. शेवटी त्यांच्याच गायलेल्या गीताच्या दोन ओळी लिहून इथेच थांबतो.

तुम हमे यू भूला ना पाओगे… जब कभी भी सुनोगे गीत मेरे… संग संग तुम भी गुनागुनाओगे…

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Happy Birthday Legend Mohammad Rafi !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.