Mahesh Kothare आणि त्यांचे Dynamic Characters…


mahesh-kothare

प्रत्येकाच्या नावाची वाट लावणे किवा नविन नाव invent करणे किती कठीण असतं ना. पण असा एक अवलिया आपल्या industry मध्ये आहे ज्याने खूपच नवनवीन आणि भन्नाट नावं आणि characters विकसित केले. Mahesh Kothare यांच्याबद्दल बोलतोय आम्ही. नविन नावं तयार करण्यात हे आपले गुरु आहेत. कशी आणि कुठून सुचली असतील यांना ही नावं. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील खलनायकांच्या नावामुळे त्यांचे चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहेत. बघूया त्यांचे fantasy characters आणि त्यांच्या punch lines.

 कवट्या महाकाळ: (Dhadakebaaz)

mahesh-kothare-dhadakebaaj

पाहिलाय ना…अरे आपला कवट्या महाकाळ.. विनोद, थरार आणि गाण्यांची धम्माल तर यात होतीच. पण त्या कवट्या महाकाळमुळे आज धडाकेबाज आपल्या लक्षात आहे. काय त्याचा तो look आणि तो आवाज. म्हणजे यासाठी Mahesh सरांना hats off द्यायलाच पाहिजे कि त्याकाळी त्यांनी एक असं character उभं केलं कि त्याचं तोंड न पाहताही ते लोकांच्या लक्षात राहिलं.

तात्या विंचू: (Zhapatlela)

mahesh-kothare-zapatlela

Mahesh Kothare म्हणजे कोणते ना कोणते fantasy character असणारच हे समीकरण झालंय. असाच त्यांचा हा Zhapatlela थरारपट आठवतोय ना? कसं विसरणार त्यातला तो तात्या विंचू आणि त्याचा तो ओम फट स्वाह: वाला dialogue. बाप रे… तो चित्रपट पाहिल्यावर तर माझ्या झोपेचे चांगलेच लागले होते. (त्या वेळी लहान होतो म्हणून हा) काय त्या तात्या विंचूचे डोळे, त्याचे ते केस.. जाम भीती वाटायची राव. कित्येक दिवस तर बाहुल्या पण जिवंत होतात म्हणून बाहुल्यांचा नादच सोडून दिला. काय माहित तुमच्या सोबत झाले कि नाही असे.

टकलू हैवान: (Thartharat)

mahesh-kothare-thartharat

य्ये, य्ये, य्येय्येय्ये.. फुस. कपाळ करंट्यानो..

टकलू हैवान चा dialogue आहे तो. प्रत्येकवेळी नविन कल्पना आणणाऱ्या Mahesh Kothare यांनी Rahul Solapurkar ला टकलू हैवान असं बनविलं कि त्याचे ते डोळे आणि ते टक्कल पाहून लहान मुले घाबरायची.. तुम्ही घाबरलात का टकलू हैवानला पाहून?

यदुनाथ जवळकर: (Dhoom Dhadaka)

mahesh-kothare-dhoomdhadaka

आठवतंय का तुम्हाला ती दाढी, ते मोठे केस, तो पाईप, वेसकोट आणि त्या मोठ्या मोठ्या वार्ता Plus “Haka Hiki Huku”??? Mahesh Kothare यांचे जवळचे मित्र म्हणजेच आपले Ashok मामा यांना घेऊन यदुनाथ जवळकर हे character तयार केले. त्यांच्या हाक्का हिक्की हुक्हूने लोकांना अक्षरशः वेडं केलं होतं. खोकल्याच्या आवाजातूनही विनोद निर्माण केला जाऊ शकतो हे आपल्याला तेव्हा कळाले. खोकला आल्यावर आपणही कधीतरी हे try करायला हरकत नाही.

गौरी शृंगारपुरे: (Khabardaar)

mahesh-kothare-khabardaar

आजवर अनेक दिग्दर्शक आणि त्यांचे चित्रपट आपण पाहिले. पण कधी हे ऐकलं किंवा पाहिलं का? कि कोणी दिग्दर्शकाने स्वतःच स्वतःची खिल्ली उडवून घेतलीय. हे काम या महारथीने  केले आहे. गौरी शृंगारपुरे चा तो dialogue “damn it”. त्याचं झालं असं की Mahesh Kothare यांना आधीपासूनच या शब्दाची इतकी सवय आहे, कि ती आजतागायत गेली नाही. याच damn it चा वापर करून त्यांनी प्रेक्षकांना खूप हसविले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात जर काही वेगळे नसेल तर तो चित्रपटच काय? म्हणूनच damn it हा dialogue आज इतका famous आहे.यासोबतच De Dana Dan, Khatarnak, Pachadlela, Jabardast यांसारख्या चित्रपटांमध्ये ही आपल्याला Mahesh Kothare style दिसून येईल.

पहा… अशी नविन नविन नावं आणि characters शोधून काढणे हे पण खूप कौश्यल्याचं काम असतं. तुम्हीपण तुमचे fantasy characters story च्या माध्यमातून CafeMarathi पर्यंत पोहोचवा. आम्ही ते सर्वांपर्यंत नक्की पोहोचवू.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Mahesh Kothare आणि त्यांचे Dynamic Characters…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.