मराठी सिनेमाचा सहामाही निकाल


सहामाही परीक्षेचा निकाल लागल्यावर आपलं प्रगती पुस्तक घरात आल्यानंतर जशी आपली परिस्थिती होते तशीच काहीशी परिस्थिती मराठी सिनेमाची झाली आहे. २०१६ या वर्षभरातील सहा महिन्यात मराठी सिनेसृष्टीत काय काय घडले ? कोण Hit आणि कोण Flop? असा सर्वकाही मराठी सिनेमाचा सहामाही लेखाजोखा CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आला आहे.. Marathi Cinema First Half Year Audit 2016…

Natsamrat ने मनं जिंकली

Natasamrat Marathi half yearly audit 2016

Jan.2016 पासून June 2016. या सहा महिन्यात Marathi films नी अनेक चढ-उतार पाहिले. या सहा महिन्यात जवळपास ५२ च्या आसपास मराठी सिनेमे Release झाले होते. यापैकी किती तुम्ही पाहिलेत? किंवा किती तुमच्या लक्षात आहेत? असो… जास्त विचारात पडू नका. २०१६ वर्षाची सुरुवातच खरी Natsamrat ने झाली. जानेवारीच्या सुरुवातीलाच आलेल्या या सिनेमाने Box Office वर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु याच महिन्यात इतर ११ सिनेमे देखील आले होते. ज्यात Friends, Guru, Bandh Naylon Che इ. सारखे बडे सिनेमे दणक्यात आपटले.

 

Poshter Girl काठावर पास

Poster Girl Marathi half yearly audit 2016

Feb. 2016 मधील ११ सिनेमांपैकी फक्त एकच सिनेमा लक्षात राहिला, परंतु तो देखील अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अपयशी ठरला. त्या सिनेमाचे नाव होते Poshter Girl. यासोबत आलेल्यांपैकी Marathi Tigers, Police Line, Mumbai Time आणि Mr.& Mrs. Sadachari हे जबरा flop ठरले. Mr.& Mrs. Sadachari कडून अपेक्षा होती पण या सिनेमाने निराश केल्याने प्रेक्षकांनी देखील या सिनेमाकडे पाठ फिरवली.

Pinjara नव्या रुपात

pinjara Marathi half yearly audit 2016

March 2016 मध्ये संख्येने कमी सिनेमे Release झाले असले तरी, त्यात एकही उल्लेखनीय सिनेमा नाही. परंतु याच महिन्यात V. Shantaram यांचा Pinjara हा super hit सिनेमा नव्या रुपात release करण्यात आला होता. Phuntroo ने तर बुवा कमालच केली. Science Fiction म्हणून promote केलेल्या या सिनेमाने solid अपेक्षाभंग केला. Anurag नावाचा एक सिनेमा पण आला होता बरं. आता त्याबद्दल फार काही बोलण्यासारखे नाही हो..

Sairat झालं जी

Sairat Marathi half yearly audit 2016

April 2016 मध्ये Marathi Film Industry मध्ये एक ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे April अखेरीस आलेल्या Sairat ने सर्वांनाच वेड लावले. प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या या सिनेमाने Marathi Film Industry मध्ये एका मागोमाग एक record करत Box office वर १०० कोटींची कमाई केली. याच महिन्यात आलेला Vrundavan मात्र दमदार आपटला होता. Sairat चा दणका फक्त इथवरच थांबला नाही तर पुढील ३ ते ४ आठवडे इतर filmmakers ना film release करायची सुद्धा भीती वाटू लागली आणि चक्क काही scheduled  सिनेमांचे release पुढे सरकले होते…हे ही नसे थोडके.

Sairat ची जादू कायम

Sairat Marathi Half year audit 3

April 2016 अखेरीस आलेल्या Sairat ने अनेक वर्षांनी मराठी सिनेमाला Houseful चा बोर्ड दाखवला. Rinku Rajguru आणि Akash Thosar हे दोन नवे चेहरे मराठी सिनेमाला मिळाले. तरी देखील नंतरच्या मे महिन्यात काही सिनेमे त्यांच्या हिमतीवर release झाले खरे परंतु त्यांच्या पदरी घोर निराशा आली. Sajay Leela Bhansali यांचा Laal Ishq देखील कधी आला आणि कधी गेला हे समजलेसुद्धा  नाही.

सिनेमांचा पाऊस

Ek ALbela Ganvesh Marathi half yearly audit 2016

June 2016 मध्ये मुसळधार पाऊस पडावा तसा या महिन्यात मराठी सिनेमाचा पाऊस पडला. या महिन्यात जवळपास १३ मराठी सिनेमे प्रदर्शित झाले. सर्व वेगवेगळ्या विषयांवरचे असूनदेखील यापैकी एकही सिनेमा प्रेक्षकांनी स्वीकारला नाही. Laalbaug Chi Rani, Cheater, Pindadan, Barni इ. सिनेमे दणक्यात पडले. Ganvesh आणि Ek Albela ने बऱ्यापैकी खिंड लढवली.

2016 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सरासरी 52 पैकी बोटावर मोजण्याइतके 2 ते 4 सिनेमे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याची कारणं काय होती, याचा विचार ज्याचा– त्याने करावा..

First Half Yearly Audit 2016 52 पैकी 2 Marathi films चांगल्या marks ने तर 2-3 काठावर pass झाले. पाहूया मग पुढील सहा महिन्यात अजून काय काय नवनवीन घडतंय…

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा…

Comments 1

Leave a Reply

मराठी सिनेमाचा सहामाही निकाल

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.