मराठी Filmmakers चं योगदान…


जगण्यासाठी काय आवश्यक असते हो? हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा आणि मनोरंजन! हो मनोरंजन हीसुद्धा माणसाची तसेच काळाची मुलभूत गरज आहे. मनोरंजनासाठी लोक काय नाही करत. पूर्वी मदारी माकडाचा खेळ दाखवूनही लोकांचे मनोरंजन करत असे. लोक मनोरंजनासाठी यात्रा, सहलीला जायचे, सर्कस पहायचे, नवीन ठिकाणी फिरायला जायचे, नाटक पाहायचे. पण त्यानंतर काळ बदलला व काळानुरूप लोकही बदलली तसेच लोकांची आवडही बदलली. मनोरंजनासाठी लोकांची आजही पहिली पसंती असते ती Movie ला!

आणि सिनेमा चालतो तो फक्त Entertainment मुळे. सिनेमा हा एक असा platform आहे कि जो अत्यंत प्रभावशाली आहे. त्यात film maker हा एक महत्वाचा घटक असतो. त्यांचे लक्ष फ़क़्त लोकांचे मनोरंजन करणे नसते तर त्याचबरोबर सामाजिक भान जपणे, आपला सिनेमा पाहून प्रेक्षक त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन जातील हे देखील त्यांना पहायचे असते. film maker च्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते ती पेलवत हलकेफुलके सिनेमे देत रसिकांचे मनोरंजनही करतात. तर जाणून घेऊया त्या निमित्ताने मराठीतील काही film makers विषयी ज्यांच्या films तुम्ही miss करू शकत नाही.

mahesh-manjrekar

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय! असे म्हणत आजच्या काळातील मराठी माणसाच्या परिस्थितीवर महाराजांचे भाष्य, अशी वेगळी संकल्पना घेऊन ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे चित्रपट आजवर दिले. त्या Mahesh Manjrekar यांचे  चित्रपट नेहमी larger than Life असतात असे म्हटले जाते ते खरंच. त्यांनी आजवर केलेल्या सिनेमातुन वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला व तो प्रयत्न यशस्वी झालाही. ज्यातून समाजाला प्रश्न पडेल असे अर्थपूर्ण सिनेमे त्यांनी दिले. Astitv, Kaksparsh, Natsamrat या सिनेमांमुळे Mahesh Manjrekar हे नाव आज संपूर्ण सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते.

ravi-jadhav

लोप पावत चाललेला तमाशा पुन्हा पडद्यावर आणून परत एकदा ज्यांनी लावणी गाजवली ते नाव म्हणजे Ravi Jadhav. ज्यांनी नटरंगसारखा सिनेमा केला. बालपणातून तारुण्यात प्रवेश करण्याआधी येते ती पौगंडावस्था आणि त्याच अतिशय संवेदनशील अवस्थेवर भाष्य करणारा व एक नवा दृष्टीकोन देणारा चित्रपट म्हणजे Baalak–Paalak. नावाप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्रातील बालकांनी तसेच पालकांनीही चित्रपटाला गर्दी करून पसंती दर्शवली. या सगळ्याचे श्रेय जाते ते Ravi Jadhav यांनाच. तोच धागा पकडून पुढे तारुण्यसुलभ अशी Timepass Lovestory त्यांनी दिली आणि प्रेम म्हणजे Timepass नव्हे हे Timepass-2 मधून त्यांनी जगासमोर आणले.

paresh-mokashi

ए गरम चाय! गरम चाय! ए बांगड्या गरम! बांगड्या गरम! असे म्हणणारी चिमुरडी किती छान वाटते ना? या लहानग्यांचे बालपण जपत, त्याच जाणीवेतून संवेदनशील असा Elizabeth Ekadashi हा चित्रपट Paresh Mokashi यांनी केला. ज्याला National Award ने गौरवण्यात आलं. त्याआधी २००९ मध्ये केलेला त्यांचा Harishchandrachi Factory या सिनेमाने Oscar चे दार ठोठावत साऱ्या जगाला आपली दखल घ्यायला लावली. Mokashi यांचे चित्रपट नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने आपली गोष्ट मांडणारे असतात.

umesh-kulkarni

समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे Umesh Kulkarni. Valu असे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. Dewool, Highway–ek Selfie Aarpaar, Vihir या त्यांच्या चित्रपटांनी International film Festival मधील सारे महत्वपूर्ण Award पटकावले.

gajendra-ahire

Not Only Mrs. Raut आठवतोय का ? Anumati, Shevri, Vasudev Balwant Phadke आणि Bioscope हे सर्व सिनेमे त्यांच्या विचारातून साकार झाले ते FilmMaker म्हणजे Gajendra Ahire. त्यांचे सिनेमा हे नेहमी सामाजिक भान जपत Social issue वर भर देणारे असतात.

sanjay-jadhav

आजवर जाधवांनी Industry मध्ये बरेच नाव कमावले. त्यापैकी Sanjay Jadhav यांचे नाव न घेता कसे चालेल? glamorus, good Looking चित्रपट असतात ते Sanjay jadhav यांचे. Duniyadari, Checkmate सारखे सिनेमे Milestone ठरले. चकाचक फ्रेम्स, महागड्या गाड्या, उंची कपडे आणि gorgeous दिसणाऱ्या अभिनेत्री ही खासियत असते त्यांच्या Films ची.

nagraj-manjule

Nagraj Manjule यांच्या सिनेमाला मराठी मातीचा गंध असतो. जातीपातीच्या विळख्यात अडकलेल्या समाज व्यवस्थेवर जब्याच्या मार्फत भिरकवलेला दगड Fandry तून आपल्याला सुन्न करून जातो तर, Sairat मधून याच समाजातील तळागाळातील भयावह वास्तव त्याने ज्याप्रकारे मांडले ते थक्क करणारे तर आहेच; परंतु अशा विषयाला Entertainment च्या package मध्ये बांधण्याचं कसब त्यांच्या अंगी आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठी Filmmakers चं योगदान…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.