जिद्दीला तोड नाही : नंदेश्वरचा टेलर बनला चित्रपट निर्माता/दिग्दर्शक…


Nandeshwar’s tailor Became Film Producer/Director…

मनामध्ये एकच ध्येय ठेवून वडिलोपार्जित शिलाईचे काम करत करत खुप कष्ट करुन एक गोष्ट केली ती गोष्ट हिंदु मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारी आणि जगाला वेगळा संदेश देणारी तसेच लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करणारी ती गोष्ट म्हणजे वेडा बी.एफ. (Boyfriend) या चित्रपटाची कल्पना. या चित्रपटात प्रथमच बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी मराठीत कव्वाली गायली आहे. या चित्रपटात महारांजाचा एक पोवाडा असा आहे की मुस्लिम शाहिरावर चित्रित करन्यात आला आहे. या चित्रपटातुन शिवाजी महाराजांना मुस्लिम समाजाचा विरोध नाही असा छोटासा संदेश देण्याचा दिग्दर्शकांनी प्रयत्न केला आहे.

 

सोलापुर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर हे खेडे गाव अपुऱ्या सोयी सुविधा जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा कसलाही संबंध नाही. तसेच कलाक्षेत्रापासुन दुर पोटाची भ्रांत मिटवण्याची धडपड करणारे लोक या लोकांपैकी एक व्यक्ती दादासाहेब शेख हे ही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून नवे जुने कपडे शिवण्याचा व्यवसाय करत. त्यांचा सर्वात लहान मुलगा आलताफ सर्व सामान्यांन सारखाच परंतु अभ्यासापेक्षा नाविन्यपुर्ण गोष्टी करण्यावरच त्याचा जास्त भर. त्याच्या निर्मिती क्षमतेची चणुक लहानपणीच दिसुन येत होती.

नावीन्याचा शोध त्याला गावाकडुन शहराकडे आकर्षित करू लागला. या पुढच्या प्रवासाचा आधार स्तंभ म्हणून मावस भाऊ सय्यद पटेल मदतीला धावून आला. मावस भावामुळे अंगभूत कलागुणांना वाव मिळेल अशा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मावस भाऊ सय्यद पटेल याच्या मदतीने वेशभूषा (फॅशन डिझायनिंग) चा अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर वेशभूषा व्यवसायामध्ये चांगला जम बसल्यानंतर चित्रपटामध्ये फॅशन डिझायनर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ८ वर्षे कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी लाभली त्यामुळे इथेच आयुष्याने वेगळे वळण घेतले पुढे चित्रपट निर्मितीचे क्षेत्र खुणावु लागले. मनामध्ये पटकथा आकार घेऊ लागली पटकथेने अंतिम स्वरूप घेतले संवाद लिहून झाले अनेक दिग्दर्शकाच्या गाठी भेटी घेतल्या पण पदरी निराशा पण हरणे माहिती नव्हते. चित्रपट निर्मितीचे स्वप्न मनात रूपांतरित झाले. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी मनाने अगोदरच केली होती.

 

मार्गातल्या एक एक अडथळ्यावर टप्या टप्याने मात करण्याचे काम सुरू झाले. प्रथम त्याने हैद्राबाद या ठिकाणी जाऊन दिग्दर्शकाचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर सकाळ इंटरनॅशनल लर्निग सेंटर पुणे या ठिकाणाहून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शुभारंभाचे चित्रिकरण पुणे येथील लोणी येथे झाले व शेवट जन्म भूमी नंदेश्वर या गावी करण्यात आला.

सध्या चित्रपट संपादनाचे काम सुरू असून लवकरच वेढा बी.एफ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे यशापयश हे प्रेक्षक ठरवतील परंतु प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. वेडा बी.एफ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक मोनु अजमीरे, छायाचित्रकार संतोष कादापुरे, कलादिग्दर्शक दिलीप धुमाळ,अभिनेता सागर भोरे, निर्माता सफर शेख, सहाय्यक दिग्दर्शक सतीश खांडवे, नंदकिशोर धकेती ,अमिर पटेल, ध्वनीमुद्रक निकम काका, विशाल तसेच मित्र मंडळीनी भरपुर साथ दिली. या चित्रपटाची निर्मिती मुंबई क्रिऐशन इंटरटेनमेंट या कंपनी अाणी रिलीसिंग पार्टनर मुस्तफा मलिक आहे. तरी प्रयत्नाचा आनंद आलताफ शेख याने घेतला असून यशप्राप्ती नंतर हा प्रयत्न आणखीनच उजळून निघेल.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
2
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

जिद्दीला तोड नाही : नंदेश्वरचा टेलर बनला चित्रपट निर्माता/दिग्दर्शक…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.