अनुभव One Way Ticket चा : Neha Mahajan


One Way Ticket या शब्दावरूनच हा कुठला तरी प्रवास असणार हे लक्षात येतं. Posters,Trailer पाहून हे देखील लक्षात येतं की, ही Cruise वरची सफर असणार आहे. आता ही सफर नेमकी कशी आहे, कुठे आहे, या सफरीवर कोण कोण आहे, त्यांच्यात काय घडलं याची सर्वांनाच उत्सुकता आहे. Neha Mahajan देखील या Cruise वरच्या सफरीची एक सदस्य आहे. तिने तिची ही Cruise वरची सफर नुकतीच CafeMarathi सोबत Exclusive share केली आहे. चला तर मग Neha Mahajan सोबत आपणही Cruise वरच्या सफरीचा आनंद घेऊया.

७०० मीटर लांब बुफेची रांग… आणि पोटात भुकेचा गोळा !

Neha Mahajan Exclusive One Way Ticket 1

Cruise वरचं shooting म्हणजे मज्जा, धम्माल असं सर्व काही असणार असं मला देखील वाटलं होतं. पण इथे Cruise वर आम्ही एकूण १५ दिवस shooting करत होतो. विशेष म्हणजे दिवसभरातून १६ ते १७ तास काम करणं तेवढं सोपं तर अजिबात नव्हतं. Neha Mahajan Cruise वरच्या गमती सांगत होती. ती पुढे म्हणाली की, मी आणि Sachit Patil ने तर एक दिवस सलग २२ तास Shooting केलं आहे. Cruise वरच्या ५ डिग्री थंडीमध्ये कुडकुडत Shooting करणं एकवेळ सोपं होतं. पण shooting च्या वेळी आमच्यासमोर Cruise वर ७०० मीटर लांब छान छान पदार्थ असलेली बुफेची रांग लागली होती. लोकांचं मजा करणं, बीयर पित पित खाणं आणि गाणं पाहून आमच्या पोटात भुकेचा गोळा यायचा. मग मध्ये break होताच आमच्या पैकी एकजण एकाच plate मध्ये सर्व घेऊन यायचा आणि आम्ही सर्व एकत्र खायचो.

आणि प्रवासी टाळ्या वाजवायाचे…

Neha Mahajan Exclusive One Way Ticket 2

Cruise वरच्या अनुभवाबद्दल Neha Mahajan म्हणाली की, एकतर Italy, France, Spain इ. अनेक देशांतील प्रवासी यात प्रवास करत होते. त्यांच्यासमोर shooting करणे हा देखील वेगळाच अनुभव होता. सुरुवातीला तर असे झाले की, माझ्या आणि Shashank Ketkar च्या सीन्सच्या वेळी आमच्यातील मोठमोठयाने बोलणे व्हायचे. Shashank माझ्यावर मोठयाने रागावतोय हा सीन पाहून अनेक प्रवासी आमच्याजवळ यायचे आणि आम्हाला शांत करायचे. मग नंतर काही दिवसांनी सर्वांना समजले की आम्ही Film चे shooting करत आहोत. Shooting Unit Members जास्त नसल्याने त्यांना सुरुवातीला समजले नसावे. Italy च्या Port वर तर प्रवासी रांग लावून shooting पहायचे आणि सीन ok झाल्यावर मनापासून टाळया वाजवायचे. हे असं पाहून आमचं मन देखील भरून येई. विशेष म्हणजे त्यांना आपली भाषा समजत नसतांनासुद्धा.

France ची Marseilles Coffee !

Neha Mahajan Exclusive One Way Ticket 3

France च्या Marseilles Coffee बद्दल सांगताना Neha त्या आठवणींमध्ये गुंग झाली. दिवस रात्र Cruise वरच्या प्रवासाने शरीर देखील नेहमी हेलकावले आहे असा Feel येत होता. कधी Cruise वरून खाली उतरून जमिनीवर पाय टेकवते असं व्हायचं आणि मध्येच France ला ४ तासांचा Break मिळाला. मी अजिबात वेळ न घालवता Cruise च्या खाली उतरले. Bus Stop वर जाऊन Bus पकडून मी France च्या Marseilles शहरात गेली. तिथे जाताच हिरव्यागार अश्या गवतावर Shoes  काढून जमिनीचा स्पर्श अनुभवत होते. कदाचित असं माझं वागणं पाहणाऱ्यांना विचित्र वाटलं असेल, पण त्यावेळी मला त्याची पर्वा नव्हती. तिथले छोटे छोटे Coffee Shops मला खुणावत होते Coffee घेऊन मी मस्तपैकी एका झाडाखाली Coffee चा आस्वाद घेत बसले.

माझी भूमिका…

Neha Mahajan Exclusive One Way Ticket 4

नेहा One Way Ticket सिनेमातील तिच्या भूमिकेविषयी म्हणाली कि, मी आणि Sachit Patil दोघेही Bloggers आहोत..मी त्याची Asst. आहे. आम्ही एका Project साठी निघालो आहोत. पाच लोकांची खरं तर हि गोष्ट आहे. सर्वांच्या गोष्टी कशा एकत्र जुळून येतात तेच या सिनेमातील  विशेष गोष्ट आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

अनुभव One Way Ticket चा : Neha Mahajan

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.