Prasad Oak : आवडीच्या पदार्थांचे 5 Favourite Spots


मराठी नाटक, TV Serial आणि Film या तिन्ही ठिकाणी हमखास दिसून येणारा चेहरा म्हणजे Prasad Oak. सिनेमात दिसून येणारा Prasad पुण्यातील काही खास अशा Restaurants  मध्ये तुम्हाला दिसला तर काही नवल वाटून घेऊ नका. कारण पुण्यात त्याची खाण्याची पाच ठिकाणं ठरलेली आहेत. अर्थात या पाचही जागा त्याच्या Favorites आहेत. नुकतंच त्याने या खास गोष्टी CaféMarathi सोबत Share केल्या…

मिसळची लज्जत भारी (बेडेकर मिसळ आणि श्री उपहारगृह)

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 1

विशेष बाब म्हणजे गेली अनेक वर्षांपासून Prasad Oak हा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या बालपणाच्या मित्रांसोबत पुण्यातील Narayan Peth येथील बेडेकरांची मिसळ हमखास खायला जातो. याबद्दल तो म्हणाला की, कितीही काम असले, काहीही झाले तरी दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही न चुकता करत असतो. शाळेतल्या मित्रांसोबत बेडेकरांची मिसळ खाणं म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. याशिवाय Sadashiv Peth येथील श्री उपहारगृहची मिसळसुद्धा मला आवडते. पण इकडे तुम्हाला यायचं असेल तर सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंतच तुम्ही येवू शकता.

होऊन जाऊ द्या तांबडा रस्सा पांढरा रस्सा (पुरेपूर कोल्हापूर)

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 2

याबद्दल Prasad Oak ने सांगितले की, नेहमीचे साधे जेवण करून कंटाळा आला असेल आणि मी पुण्यात असेल तेव्हा माझ्या मित्राच्या Sadashiv Peth येथील पुरेपूर कोल्हापूरमध्ये हमखास जातो म्हणजे जातोच. झणझणीत तांबडा रस्सा पांढरा रस्सा खावा तर इकडेच यार. धनगरी मटण, चिकन, खिमा वाटी असं सर्व काही फक्त इकडेच. पुण्यातील माझं दिवसभरातील सर्व काम आटपून मी रात्री इकडे जेवण करूनच जातो. हे माझं नेहमीचं ठरलेलं आहे.

पिठलं नि भाकरी (आबाचा ढाबा)

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 3

गरमा गरम बाजरीची किंवा तांदळाची भाकरी आणि त्यासोबत अस्सल मराठीमोळं पिठलं आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या खाण्यासाठी मी Alka Talkies Chowk मधील आबाचा ढाबामध्ये नक्की जातो. पुणे शहरात जरी हे असलं तरी याला गावची चव आहे हे खूप महत्वाचे…Prasad Oak सांगत होता.

मासे खावे तर इकडेच (निसर्ग)

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 4

Prasad Oak पुढे म्हणाला कि Nal stop, Erandwane इथे निसर्ग नावाचे एक hotel आहे. काय भारी मासे मिळतात राव इकडे. माश्यांचे सर्व प्रकार इथेच मला आवडीने खायला मिळतात, त्यामुळे जेव्हा जेव्हा  पुण्यात आल्यावर मला मासे खावेसे वाटतात तेव्हा मी निसर्गमध्ये हमखास येतो.

Prasad Oak यांना आवडणारे पाच Special पदार्थ

धनगरी मटण,चिकन,प्राँझ,थालीपीठ,मिसळ…

पुण्यातला आवडता नाश्ता ( स्वरूप हॉटेल )

नाटक किंवा सिनेमाच्या shooting साठी पुण्यात असल्यावर Deccan Gymkhana जवळ असलेले स्वरूप hotel चा साधा डोसा आणि मिसळ हे माझे आवडते पदार्थ. Prasad Oak पुढे म्हणाला की पण याहून अधिक भारी म्हणजे इथला पायनॅपल शिरा… वाह… वाह… क्या बात है यार.

बायकोच्या हातचा आवडता पदार्थ

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 5

गप्पांच्या ओघात Prasad ने एक Secret CafeMarathi सोबत share केलं कि मला अजिबात Kitchen मध्ये जायला आवडत नाही पण बायकोच्या हातचं कोळंबीचं कालवण मात्र खूप आवडतं.

Life मधला पहिला खेकडा कधी खाल्ला

Prasad Oak 5 Favourite Restaurants Pune 6

याबद्दल Prasad Oak म्हणाला की, खेकडा हा माझा सर्वात नावडता प्रकार होता. त्यामुळे मी तो कधीच खाल्ला नव्हता. मित्रवर्य Pushkar Shrotri ने तर अनेकदा मला आग्रह केला. Pushkar ची आई खेकडा छान बनवायची. त्याच्या आग्रहाखातर मी एकदा त्याच्या आईने बनवलेला खेकडा खाल्ला… ओह.. ओह… काय सांगू तुम्हाला यार…. पण इतका Tasty खेकडा मी आजवर कधीच खाल्ला नाही. आता जेव्हा कधी मी खेकडा खातो तेव्हा मला Pushkar च्या आईची आठवण नक्कीच होते.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 3

Leave a Reply

  1. प्रसाद ओक माझे आवडीचे कलाकार आहेत..त्यांच्या बद्दलची माहीती दिल्ल्या बद्दल कॅफे मराठीचे आभार

  2. प्रसाद जेवढा चांगला नट आहे त्याहून चांगला माणूस आहे , आणि मराठी कॅफ़े मूळे त्याची खाण्या ची आवड समाजसली next time हेच खिलविंन ।

Prasad Oak : आवडीच्या पदार्थांचे 5 Favourite Spots

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.