
भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे…‘भय’.
अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भय’या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.
प्रेम झानगीयानी प्रस्तुत अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे तर संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. संगीत रोहित नागभीडे आणि मिहीर भट, पार्श्वसंगीत आशिष, गीत वैभव देशमुख यांचे लाभले आहे. तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर, संकलन उज्वल चंद्रा सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केली आहे. तर सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून त्रिलोक सिंग राजपूत यांनी जबाबदारी पार पाडली आहे. येत्या शुक्रवारी २ मार्चला ‘भय’ प्रदर्शित होणार आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0