बाबा थांब ना रे तू….- Priyanka Chopra


Desi Girl Priyanka Chopra  सध्या अभिनयासोबतच इतर अनेक ठिकाणी आपलं नशीब आजमावून पाहताना दिसत आहे. Priyanka ने Bajirao Mastani या चित्रपटामध्ये मराठामोळ्या Kashibai ची भूमिका साकारली होती. त्या Role नंतर ती जणू मराठीच्या प्रेमातच पडली आहे असे वाटतंय. Ventilator Movie मधून Priyanka सुद्धा एक कलाकार म्हणून हजेरी लावणार अशी चर्चा सगळीकडे चालू असतानाच Priyanka ने अजून एक Surprise Package सगळ्यांसमोर आणलंय.

Priyanka song baba

नेहमीच आईचं नाव प्रत्येक गोष्टीसाठी घेतलं जातं. पण बाबा हा मुलांसाठी सर्वकाही करून मागेच राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबांचं स्थान हे अतिशय महत्वाचं असतं. त्याला फक्त केवळ काही ठराविक गोष्टींसाठी आठवलं जातं. बाबाचा अर्थ पटवून सांगणारं एक मराठी गाणं तेही Priyanka Chopra  च्या आवाजात आजच Release करण्यात आलं आहे. Priyanka ही आपल्या बाबांसोबत खूप Connect होती हे सगळ्यानाच माहित आहे. त्या Emotion सोबतच Priaynka ने हे गाणं गाऊन सगळ्यांना आणखीनच Emotional करून टाकलंय असे म्हणायला हरकत नाही. बाबा काय असतो? बाबा प्रत्येक गोष्ट बोलत नसला तरी काय करतो? हे सर्व या गाण्यातून अतिशय चांगल्याप्रकारे मांडण्यात आलं आहे.

Priyanka ही अभिनेत्री असण्यासोबतच एक गायिका म्हणूनही लोकप्रिय आहे. तिने आतापर्यंत Hindi आणि English मध्ये गाणी गायली आहेत. आता पहिल्यांदाच मराठीमध्ये गाणं गाऊन तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एक गायिका म्हणून तिने या गाण्यालाही पूर्ण न्याय दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.

Priyanka जितक्या सहजतेने Bollywood, Hollywood मध्ये वावरते तितक्याच सहजतेने तिने या चित्रपटातील आपली भूमिका पार पाडलीआहे असे दिसून येते. Priyanka ची लोकप्रियता, प्रेक्षकांना तिच्याबद्दल वाटणारे कुतूहल आणि तिची उत्सुकता या साऱ्याचा अंदाज घेत दिग्दर्शकाने त्याचा चित्रपटात चांगलाच वापर केलाय एवढं मात्र नक्की. आता प्रियांकाच्या मराठमोळ्या अंदाजाला प्रेक्षक किती दाद देतील हे बघायला हवं.

Ventilator हा सिनेमा एक Family Drama असून नातेसंबंध, बाबा यांचं महत्व सांगणारी एक कथा गुंफण्यात आलेले दिसून येते. या सिनेमात मराठीतील १०० हून अधिक कलाकार काम करताना बघायला मिळणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन Ferrari Ki Sawari fame Rajesh Mapuskar यांनी केलं असून लेखनही त्यांनीच केलं आहे. Ventilator हा सिनेमा उद्या Release होणार आहे.

Comments 0

Leave a Reply

बाबा थांब ना रे तू….- Priyanka Chopra

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.