पुण्यातील खाऊगल्ल्या !!!


‘Pune तिथे काय उणे’ असं उगाचचं म्हटलं जात नाही. Pune हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं. ही एक ऐतिहासिक पाश्वभूमी आहे. Pune मधल्या जश्या जागा Popular आहेत तश्याच काही खाण्याच्या जागा देखील Popular आहेत. तसेच पुण्यातल्या पाट्या म्हणजे धमालच… फोटो खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा आम्हास नाही! एक मिसळ दोघांत खाऊ नये अन्यथा १० रु. ज्यादा आकारले जातील! बंगला रिकामा आहे, चोरण्यासारखे काहीही नाही विनाकारण कष्ट घेऊ नये….!

अश्या पाट्या बघायला मिळाल्या म्हणजे तुमचे पुण्यात स्वागत झालेलं आहे, असं समजा. येथील पुणेरी पाटयांप्रमाणेच तितकचं Popular म्हणजे पुणेरी खाऊगल्ल्या. काय राव तुम्ही पुण्यात आलात आणि शेवयांची मस्तानी, चितळ्याचं दुध, पुणेरी भेळ आणि झणझणीत मिसळ यांचा आस्वाद घेतला नाही तर मग काय नवलच! चला तर मग CaféMarathi घेऊन आलेत पुण्यातील खाऊगल्ल्या. जिथे तुम्ही मनसोक्त खाण्याचा आणि तेथील चवीचा आनंद घेऊ शकता.

Vaishali

vaishaliPune मधील FC Road वर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला Vaishali समोर एक मोठ्ठी रांग उभी असलेली दिसेल. तुम्ही येथे आलात तर दही पुरी, शेव पुरी आणि साबुदाणा वडा तेही खोबऱ्याच्या चटणी सोबत नक्की खा. तसेच White Butter किंवा लोणी सोबत असलेले चविष्ठ डोसा तर लाजवाब! त्याचप्रमाणे Breakfast साठी पावभाजी देखील इकडच्या स्थानिक लोकांना जशी आवडते तशी तुम्हाला देखील ती नक्की आवडेल.

Amriteshwar Pohe

amriteshwar

Night Out मारून सकाळ सकाळी भूक लागली आहे का? Students च्या काही मध्यरात्रीच्या ‘Study Sessions’ नंतर Amriteshwar जवळील Naal Stop Signal वर ताजे गरमागरम कांदे पोहे, साबुदाणा खिचडी, इडली आणि चहा मिळते. सकाळी ६ वाजता आणि कधी कधी त्या आधी देखील शांत रस्त्यावर Street Lights खाली Amriteshwar वर Dozen भर Bikes Park केलेले तुम्हाला दिसून येतील, ते म्हणजे इकडचे कांदे पोहे खाण्यासाठी. हे खाण्यासाठी तुम्ही देखील इथे पहाटे पहाटे याच.

Shabree

shabree

थालीपीठ हे येथील स्थानिक लोकांचा आवडता पदार्थ असून तो वेगवेगळ्या धान्यांपासून बनत असल्यामुळे चविष्ठ आणि तितकाच Healthy देखील आहे. त्याचमाणे येथे इतर चवदार महाराष्ट्रीयन खाण जसं कि साबुदाणा खिचडी, भरलेली वांगी, बटाट्याची भजी, आमटी, वरण-भात अशी अस्सल मेजवानी इथे असते. जर तुम्ही शाकाहारी असाल तरी तुम्ही नक्की येथे या.

Bedekar Missal

bedekar-misal-pune-maharashtrian-restaurants1

मिसळ ही वेगवेगळे कडधान्य, रस्सा, फरसाण आणि पाव सोबत Serve केली जाते. महाराष्ट्रातील पुणेरी मिसळ हि सगळ्यात उत्तम मिसळ म्हणून ओळखली जाते. सगळ्यात Popular असणारी पुण्यातील मिसळ ही Bedekar Missal आहे. या जागी तुम्हाला घरी असल्याप्रमाणे स्टीलच्या थाळीत गरमागरम मिसळ दिली जाईल.

Sujata mastani

sujata-mastani

कधी तुम्ही तुमच्या आवडत्या Fruit Flavor बरोबर केसर टाकून मस्तानी try केली आहे का? एकवेळचे जेवण विसरा आणि भरगच्च Fruits & Creamy असलेले असे देसी Handmade Ice-cream म्हणजेच मस्तानी खा. वेगवेगळ्या प्रकारचे Dry Fruits, Fruits आणि Milkshake add केलेले केसर आणि चेरी सोबत भरगच्च अशी मस्तानी, हिला ५० वर्षाआधीपासुंचा इतिहास लाभला आहे. Sujata mastani हे पुण्यातील नामवंत मस्तानी केंद्र आहे असं म्हणण्यास हरकत नाही. कारण आता त्यांचे Pune मध्ये वेगवेगळे Branches देखील आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या Branches मध्ये जा आणि थंडगार मस्तानीचा आस्वाद घ्या.

Kalyan Bhel

kalyan-bhelयांच्या शाखा पूर्ण पुण्यामध्ये मिळतील. कारण यांच्यासारखी चविष्ठ भेळ कोणी बनवू शकत नाही. मी तुम्हाला यांची ख्याती किती ही सांगितली तरी तुम्हाला ती इथे आल्याशिवाय कळणार नाही. येथे भेळ गोड, तिखट, आंबट अश्या वेगवेगळ्या Flavour मध्ये तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे त्यांच्या चविष्ठ चटणी मुळे ते जास्त  Popular आहेत.

Chitale

chitaleChitale हे फक्त  भारतामध्येच नाही तर जगभर त्यांच्या पेठा आणि भाकरवडीमुळे प्रसिद्थ आहेत. यांच्या मालकांनी वाढत्या उत्पादनासाठी Machine’s double आणि triple प्रमाणात चालू केलेत. इतकी Quantity वाढून त्यांची चव मात्र तशीच आहे. येथील Specialty  म्हणजे केसर पेढा, साखर पेढा आणि सध्याचा Trendy sandwich पेढा. इथे भरपूर प्रमाणात पेढयातील Variety तुम्हाला मिळेल. याचप्रमाणे येथील खुसखुशीत आणि चविष्ठ भाकरवडी तुम्ही विसरूच शकत नाही. हल्ली तर लोक खास Chitale भाकरवाडी घेण्यासाठी पुण्यात येतात.

J.J. Garden Vada Pav

jj-vadapavपुण्यात उत्तम वडा पाव शोधताय? M.G. Road जवळील J.J.Garden Vada Pav मध्ये जा आणि स्वादिष्ठ तिखट, गोड चटणीसोबत गरमागरम वडा पाव खा.

Joshi Wadevale

joshi-vadewale

पुण्यात अत्यंत Popular असे Joshi Wadevale तुम्हाला माहिती आहेत का? यांची Popularity जाणून घ्यायची असेल तर Google वर  www.Joshiwadevale.com  Search करा. Joshi Wadevale म्हणजे पुण्यातील Mc-Donald’s अशी यांची ओळख आहे. Quality अतिशय उत्तम आणि वड्यांबरोबर तुम्हाला कढई Fresh, Green Fried Chillies & Chutnyes देखील मिळतील.

मग कधी जाणार आता पुण्यात? पुण्यातील खाऊगल्ली मध्ये स्वाद घ्यायला. कशी वाटली तुम्हाला हि पुण्यातील खाऊगल्ली खालील Comment Box द्वारे नक्की कळवा.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पुण्यातील खाऊगल्ल्या !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.